Thursday, 2 June 2011

        आपणास कळविण्यास आनंद होत आहे की, ह्या वर्षीची ३ री महाराष्ट्र हास्ययोग परिषद नाशिक जिल्हा हास्ययोग समन्वय समिती, नाशिक तर्फे नाशिकमध्ये घेण्याचे ठरविले आहे. नाशिकमधील हास्य चळवळीलादेखील १५ वर्षे पूर्ण झाली आहेत.
        नाशिक शहर धार्मिक व सांस्कृतिक वारसा लाभलेले व नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे. तसेच नाशिक जवळ वणी , त्र्यंबकेश्वर , शिर्डी , सापुतारा , अशी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
       दिनांक १० व ११ डिसेंबर २०११ रोजी घेण्यात येणारी महाराष्ट्र हास्ययोग परिषदेत आपणा सर्वांना जागतिक कीर्तीचे हास्ययोगाचे संस्थापक व प्रणेते मा. डॉ. मदन कटारिया, माधुरी कटारिया, तसेच मुंबई, पुणे व नाशिक येथील हास्ययोग तज्ञांचे अनमोल मार्गदर्शन लाभणार आहे. डॉ. मदन कटारिया हास्ययोगावरील संशोधन व शास्त्रीय माहिती देणार आहेत. त्याचबरोबर नवीन हास्यप्रकार, देशविदेशातील हास्य चळवळीचा वृत्तांत व संपूर्ण हास्ययोग सत्र ह्याचे मार्गदर्शन मिळणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही ही परिषद २ दिवसांची ठेवली आहे.
       आपणास हे पहिलेच पत्र पाठविण्याचा हेतू म्हणजे आपण आपल्या क्लबमधील सर्व सदस्यांना याविषयी माहिती देऊन १० व ११ डिसेंबर २०११ हे २ दिवस परिषदेसाठी राखून ठेवावे. परिषदेच्या निमित्ताने 'स्मरणिका' प्रकाशित करण्याचे ठरविले असून त्यासाठी आपण आपल्या विभागातील हास्यचळवळी विषयक लेख ३१ ऑगस्ट पर्यंत जरूर पाठवावे. त्यासाठी शब्दमर्यादा २०० ची आहे. तसेच स्मरणिकेसाठी जास्तीत जास्त जाहिराती देवून सहकार्य करावे. तसेच आपल्या क्षेत्रातील सर्व हास्यक्लबच्या अध्यक्षांचा पत्ता , फोन नंबर, व ई- मेल पत्ता , त्वरीत पाठवावे. 
       परिषदेचे माहितीपत्रक व नोंदणी फॉर्म लवकरच पाठवीत आहोत. जाहिरात पत्रक सोबत पाठवीत आहोत.
       आपल्या सहकार्याची अपेक्षा. धन्यवाद .
       कळावे. हो   हो   हा   हा   हा ...... 
आपले हास्यस्नेही ,
नियोजन समिती 
  •  अध्यक्षा                       डॉ. सौ . सुषमा आर . दुगड.                  ९४२०८३२३६५
  •  कार्याध्यश्या               श्रीमती. मंजिरीताई वैद्य.                         ९८२२८७७४६३
  •  सचिव                          श्री. राजेंद्र भंडारी.                                    ९७६६६६७२०१
  •  सचिव                          सौ. अदिती वाघमारे.                               ९८५०६८२५२९
  •  सहसचिव                    अंड. आर. डी. बाफणा.                           ९२२६३२४०५०
  •  सहसचिव                     सौ. आश्विनी धोपावकर.                           ९४२२६७६७४९
पत्रव्यवहारासाठी पत्ता 
१.   डॉ. सौ . सुषमा आर . दुगड. 
      आठवले चेंबर्स , गावकरी प्रेस समोर, ,
      टिळक पथ , नाशिक ४२२००२
      मोबाइल  ९४२०८३२३६५ 
     ई मेल  पत्ता       sushama_dugad@yahoo.co.in
                              nashik.hasyaparishad2011@gmail.com

No comments:

Post a Comment